तीनी जीबी रॅमयुक्त जोलो ब्लॅक एक्स वन

0

जोलो या भारतीय कंपनीने बाजारात आपल्या ब्लॅक सेरीजमधील एक्स वन हा तब्बल तीन जीबी रॅम असणारा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.

काही महिन्यांपुर्वीच जोलो कंपनीने ब्लॅक हा स्मार्टफोन सादर केला होता. आता याच श्रेणीत ब्लॅक एक्स वन हे मॉडेल लॉंच ९,९९९ रूपयांना सादर करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबरपासून हा स्मार्टफोन फक्त स्नॅपडील या ई-पोर्टलवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

जोलो ब्लॅक एक्स वन या मॉडेलमध्ये मध्यम किंमतपट्टयात अतिशय उत्तम फिचर्स दिलेले आहेत. यातील सर्वात लक्षणीय म्हणजे याची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी इतके दिलेले आहे. मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्याने स्टोअरेज वाढविणे शक्य आहे. जोलो ब्लॅक एक्स वनमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा एचडी आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. यावर ड्रॅगन ट्रेल ग्लास प्रोटेक्शन हे संरक्षक आवरणही पुरविण्यात आले आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या लॉलिपॉप व्हर्शनवर चालणारे असून यावर जोलो कंपनीने हाईव्ह ऍटलास हा युजर इंटरफेस दिलेला आहे. यात ६४ बीट मीडियाटेक एमटी६७५३ प्रोसेसर आहे.

जोलो ब्लॅक एक्स वन या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅशसह १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे कॅमेरे आहेत. ड्युअल सीम प्रकारातील या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व थ्री-जी या नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी सुविधा दिलेल्या आहेत. तर यात २४०० मिलीअँपीअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. नावाप्रमाणेच हा स्मार्टफोन काळ्या रंगात सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here