तीन व्हेरियंटमध्ये मिळणार शाओमी रेडमी ५

0

शाओमी कंपनीने किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा शाओमी रेडमी ५ हा स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

भारतीय बाजारपेठेत एंट्री आणि मीडल या दोन्ही किंमतपट्टयांमधील स्मार्टफोन सर्वाधीक प्रमाणात विकले जातात. शाओमी कंपनीनेही याच प्रकारातील मॉडेल्सला प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने शाओमी रेडमी ५ हे मॉडेलदेखील हे सादर करण्यात आलेले मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. याचे २ जीबी रॅम असणारे व्हेरियंट ७,९९९; ३ जीबी रॅमयुक्त ८,९९९ तर ४ जीबी रॅमयुक्त मॉडेल १०,९९९ रूपये मूल्यात मिळणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलसह ‘मी.कॉम’ तसेच ‘मी होम’ या शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.

शाओमी रेडमी ५ या स्मार्टफोनमध्ये १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा ५.७ इंच आकारमानाचा व एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर देण्यात आला आहे. याचे २ जीबी रॅम/१६ जीबी स्टोअरेज; ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज असे तीन व्हेरियंट आहेत. यात एफ/२.२ अपार्चर, पीडीएएफ, एचडीआर आणि एलईडी फ्लॅश आदी फिचर्सने सज्ज असणारा आणि १.२५ मायक्रॉन पिक्सल्सयुक्त १२ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आहे. तर यातील ५ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍यात एलईडी सेल्पी फ्लॅश, फेस रिगक्नीशन आणि स्मार्ट ब्युटी ३.० हे फिचर्स दिलेले आहेत.

शाओमी रेडमी ५ या मॉडेलमध्ये ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा एमआययुआय ९ हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here