दोन व्हेरियंटमध्ये मिळणार शाओमी रेडमी वाय २

0

शाओमी कंपनीने आपला रेडमी वाय २ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे.

शाओमी रेडमी वाय २ या मॉडेलचे ३ जीबी रॅम व ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज तसेच ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे ९,९९९ आणि १२,९९९ रूपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार असून १२ जून रोजी याचा पहिला सेल होणार आहे. याची आयसीआयसीआय बँक कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना ५०० रूपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे. तर एयरटेलने १८०० रूपयांच्या कॅशबॅकसह २४० जीबी मोफत डाटा देण्याची ऑफर प्रदान केली आहे. ( दोन्ही ऑफर्ससाठी अटी-शर्ती लागू आहेत.)

शाओमी रेडमी वाय २ या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा, एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आणि १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे ३/४ जीबी रॅम व ३२/६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट असून ही क्षमता मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात १२ व ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यात बोके इफेक्टची सुविधा असेल. यात कृत्रीम बुध्दीमत्तायुक्त ब्युटी इफेक्ट दिलेला आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे यामध्ये कुंकू/टिकली, कंगण आदी भारतीय आभूषणांना ओळखून याला ब्युटी इफेक्ट देण्याची सुविधा दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये सॉफ्ट एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यातील बॅटरी ३०८० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हे मॉडेल्स अँड्रॉइडच्या ओरिओ आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा एमआययुआय ९.५ हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here