पुढील महिन्यात येणार आयफोन-६

0

ऍपल कंपनीचा बहुप्रतिक्षित आयफोन-६ पुढील महिन्यात ग्राहकांना सादर होणार असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात ऍपल ९ सप्टेंबरला एका शानदार कार्यक्रमात या स्मार्टफोनला लॉंच करण्याची शक्यता आहे.

iphone6

साधारणपणे ऍपली कंपनीतर्फे वर्षाला एक याप्रकाणे आयफोनचे मॉडेल सादर होत असते. गेल्या वर्षी आयफोन-५ ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला होता. यानंतर या वर्षाच्या सुरवातीपासूनच या स्मार्टफोनचे पुढील व्हर्शन अर्थात आयफोन-६ कसे असेल? याबाबत अनेक कयास लावण्यात आले होते. याची अनेक छायाचित्रेही इंटरनेटवर लीक झाली होती. या पार्श्‍वभुमीवर आता ‘री/कोड’ या विख्यात संकेतस्थळाने ९ सप्टेंबर रोजी आयफोन-६ लॉंच होणार असल्याची माहिती दिली आहे. ‘री/कोड’चे ऍपल कंपनीबाबतचे माहिती स्त्रोत अत्यंत विश्‍वासार्ह असल्याचे यापुर्वीच सिध्द झाले आहे. त्यांची सर्व भाकिते आजवर खरी ठरली आहेत. यामुळे ९ सप्टेंबर रोजी एका शानदार कार्यक्रमात आयफोन-६ सादर करण्यात येणार असून यासाठी ऍपलने प्रसारमाध्यमांना निमंत्रण पाठविण्याची तयारीदेखील केल्याची माहिती ‘री/कोड’ने दिली आहे.

आयफोन-६ मध्ये ग्राहकांसाठी अत्याधुनिक फिचर्स असणार आहेत. आजवर आयफोनचे स्क्रीन लहान होते. आयफोन-६ मात्र ४.७ इंच आकाराचा डिस्प्ले असणार आहे. याशिवाय याचे ५.५. इंच आकारमानाचे व्हर्शनही लॉंच करण्याची शक्यता आहे. यात प्रथमच अत्यंत अभिनव असा सफायर डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यात प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा राहणार आहे. आयफोन-६ हा स्मार्टफोन आयओएसच्या नवीन व्हर्शनवर चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जगभरात आयफोनचा खास चाहतावर्ग आहे. त्यांच्यासाठी आयफोन-६ या नवीन व्हर्शनचे लॉंचिंग म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here