इंटेक्स कंपनीने फक्त ४,४९९ रूपये मूल्यात ड्युअल सेल्फी कॅमेरे असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.
सध्या ड्युअल कॅमेर्यांचा ट्रेंड आला आहे. यात मागील बाजूस तसेच पुढील बाजूस दोन कॅमेरे दिलेले असतात. सध्या मिड रेंजमधील अनेक मॉडेल्समध्ये या प्रकारातील कॅमेरे देण्यात आलेले आहेत. तथापि, इंटेक्सने आता फक्त ४,४९९ रूपये मूल्यात स्टारी ११ हा स्मार्टफोन सादर केला असून यात ड्युअल फ्रंट कॅमेर्यांची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हे दोन्ही कॅमेरे ८ व २ मेगापिक्सल्सचे आहेत. यांच्या मदतीने अगदी सजीव वाटणार्या सेल्फी घेता येणार आहेत. तसेच यामध्ये बोके इफेक्ट देण्याची सुविधाही देण्यात आली आहे. तर यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यामध्ये एलईडी फ्लॅश दिलेला असून रिअल टाईम बोके इफेक्ट देता येणार आहे. तसेच यामध्ये बॅकग्राऊंड चेंज, नाईट शॉट, फेस ब्युटी, फेस डिटेक्शन, बर्स्ट मोड, पॅनोरामा आदी विविध फिचर्स देण्यात आलेले आहेत.
इंटेक्स स्टारी ११ या स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा व एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर स्प्रेडट्रम एससी९८५० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील बॅटरी २,४०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
टेकवार्ताविषयी
टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.
Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.