फेसबुकवर आता फ्लोटींग व्हिडीओ पहायला मिळणार आहेत. या माध्यमातून आपण व्हिडीओ पाहत असतांना फेसबुकच्या न्यूजफिडवर सर्फींग करू शकणार आहोत.
टंबरआर या सोशल नेटवर्कींग साईटवर फ्लोटींग व्हिडीओ ही सुविधा देण्यात आली आहे. आता फेसबुकवरही हीच सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जगात प्रथम ‘नेक्स्ट वेब’ या टेक-पोर्टलने याला टिपले आहे. फेसबुकवर कोणत्याही व्हिडीओच्या खाली यासाठी एक पर्याय देण्यात आला आहे. यावर क्लिक करून आपण फ्लोटींग व्हिडीओ पाहू शकतो. यामुळे वापरकर्त्याला व्हिडीओ पाहत असतांनाच फेसबुकवरील अन्य सामग्री एकदचा पाहता येते.
फेसबुकने व्हिडीओ शेअरिंग साईट युट्युबला टक्कर देण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी प्रारंभी या साईटवरील व्हिडीओ एंबीड करण्याची सुविधा देण्यात आली होती. यानंतर युट्युबप्रमाणेच या साईटवरील व्हिडीओजवरही जाहिराती देण्यास प्रारंभ झाला आहे. यानंतर आता फ्लोटींग व्हिडीओ ही सुविधा देण्यात आली आहे हे विशेष.