फेसबुक आणि ट्विटर या सोशल साईटस अमेरिकेतील नागरिकांच्या बातम्यांसाठी सर्वात मोठा स्त्रोत बनल्याचे नुकतेच एका सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे.
अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने नुकतेच एक सर्व्हेक्षण केले. यात तब्बल ६२ टक्के लोकांनी आपण फक्त फेसबुक व ट्विटरवरच बातम्या वाचत असल्याचे नमुद केले आहे. यातील ५२ टक्के लोकांनी ट्विटरला तर ४७ टक्के जणांनी फेसबुक साईटला पसंती दिली आहे. सध्या ६६ टक्के अमेरिकन फेसबुक तर १७ टक्के नागरिक ट्विटर वापरत आहेत. या पार्श्वभुमिवर या दोन्ही साईट बातम्यांचे विश्वसनीय स्त्रोत बनत आहेत ही बाब अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
या सर्वेक्षणात ट्विटर हे ब्रेकिंग न्यूजसाठी आघाडीवर असल्याचे अधोरेखित झाले आहे. ५९ टक्के वापरकर्त्यांनी आपल्याला ट्विटर या साईटच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे. ३१ टक्क्यांना मात्र फेसबुकच्या माध्यमातून ताज्या बातम्या मिळत असतात.