न्युयॉर्क- फेसबुकने आपल्या पेजेसच्या ले-आऊटमध्ये बदल केला असून तो आता एक कॉलम पध्दतीत करण्यात आला आहे.
फेसबुकने काही दिवसांपुर्वी वैयक्तीक पेजेसच्या फिडच्या मांडणीत बदल केले होते. आता पेजेसची मांडणीही बदलण्यात आली असून याबाबत आज अधिकृत घोषणा करण्यात आली. या अंतर्गत पेजेसला लाईक केलेल्यांना यावरील कंटेंट चांगल्या पध्दतीने पाहता येणार आहे. याचसोबत पेज चालवणार्यांना ऍडमीन पॅनलमध्येही आपल्या पेजच्या परफॉर्मन्सविषयी सखोल माहिती मिळू शकणार आहे.