ब्ल्यू या अमेरिकन कंपनीने भारतात ‘स्टुडिओ एनर्जी टू’ आणि ‘एनर्जी एक्स’ या नावाने दोन अतिशय उत्तम बॅटरी असणारे स्मार्टफोन सादर केले आहेत.
‘स्टुडिओ एनर्जी टू’ हा स्मार्टफोन पाच इंच आकारमानाच्या १२८० बाय ७२० म्हणजेच एचडी क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. यावर कॉर्निंग ग्लास थ्रीचे आवरण आहे. यात ६४ बीट क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३५ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम १.५ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. हा स्मार्टफोन ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्यांनी सज्ज आहे. यात तब्बल ५,००० मिलीअँपीअर क्षमतेची बॅटरी आहे. याच्या मदतीने तीन दिवसांचा स्टँडबाय टॉकटाईम तर ४८० तासांचा स्टँडबाय टाईम शक्य आहे. भारतात हा स्मार्टफोन १७९ डॉलर्सला मिळणार आहे.
तर ‘एनर्जी एक्स’ हा स्मार्टफोन पाच इंच आकारमानाच्या एचडी आयपीएस डिस्प्लेने सज्ज आहे. यावरही गोरीला ग्लास थ्रीचे संरक्षक आवरण आहे. यात क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी ६५८० प्रोसेसर आहे. याची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. हा स्मार्टफोन १०९ डॉलर्सला मिळणार आहे.
यातील ‘स्टुडीओ एनजी एक्स’ हा स्मार्टफोन फोर-जी तर ‘एनर्जी एक्स’ हा थ्री-जी कनेक्टिव्हिटीने सज्ज आहे. तसेच दोन्ही स्मार्टफोन वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, जीपीआरएस/एज, मायक्रो-युएसबी पर्यायांनी सज्ज आहेत.