भारतात मिळणार अमेझॉन फायर टिव्ही स्टीक फोर-के !

0
अमेझॉन फायर टिव्ही स्टीक फोर-के, amazon fire tv stick 4k

अमेझॉनने भारतीय बाजारपेठेत आपल्या फायर टिव्ही स्टीकची फोर-के आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे.

फायर टिव्ही हे युएसबी ड्राईव्हसारखे उपकरण स्ट्रीमिंगसाठी वापरले जाते. याच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांवरील कंटेंट हे टिव्हीवर पाहता येते. भारतात फायर टिव्ही स्टीक आधीच लाँच करण्यात आलेली असून याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता अमेझॉन फायर टिव्ही स्टीक फोर-के हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यामध्ये फोर-के म्हणजेच अल्ट्रा हाय डेफिनेशन या दर्जाचे स्ट्रीमिंग करता येणार आहे. भारतीय बाजारपेठेत अलीकडच्या काळात फोर-के टिव्ही लोकप्रिय होेत आहेत. या प्रकारचे अनेक किफायतशीर दर्जाचे मॉडेल्स बाजारात दाखल होत आहेत. यामुळे या प्रकारातील टिव्हींवर स्ट्रीमिंगसाठी ही फायर टिव्ही स्टीक उपयुक्त ठरणार आहे. यात सध्याच्या टिव्हींमध्ये असणार्‍या एचडीआर १०+ आणि डॉल्बी व्हिजन या तंत्रज्ञानांचाही सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. अर्थात या मॉडेलच्या मदतीने अतिय सुस्पष्ट आणि दर्जेदार असे स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.

याच्या जोडीला अमेझॉन फायर टिव्ही स्टीक फोर-के हे उपकरण अन्य कामांसाठीही उपयोगात येणार आहे. यात अमेझॉनच्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. अर्थात, ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने कुणीही याचा रिमोट कंट्रोल म्हणून वापर करू शकणार आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्याला हव्या त्या कार्यक्रमाला सर्च करू शकतो. याशिवाय, याला नॉन स्ट्रीमिंग उपकरणांनाही कनेक्ट करता येणार आहे. यात स्मार्ट लाईट तसेच अन्य स्मार्ट होम डिव्हाईसचाही समावेश आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलेला असून ८ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज प्रदान करण्यात आले आहे. या स्टीकचे मूल्य ५,९९९ रूपये असून याची अमेझॉन इंडियावरून अगावू नोंदणी सुरू आहे. हे उपकरण प्रत्यक्षात १४ नोव्हेंबरपासून ग्राहकांना मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here