महिंद्रा कंपनीने भारतात टियुव्ही ३०० हे कॉंपॅक्ट एसयुव्ही या वर्गवारीतील मॉडेल नुकतेच सादर केले आहे.
भारतात एसयुव्ही आणि कॉंपॅक्ट एसयुव्ही या वर्गवारीतील अनेक मॉडेल्स लॉंच होत आहेत. या पार्श्वभुमिवर महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने नुकतेच डिझेलवर चालणारे टियुव्ही ३०० हे मॉडेल लॉंच केले आहे. ६.९० ते ९.१ लाख रूपयांमध्ये (मुंबईतील एक्स-शोरूम मुल्य) याचे विविध व्हेरियंटस सादर करण्यात आले आहेत. हे मॉडेल महिंद्राच्याच क्युआंतो आणि स्कॉर्पिया यांच्यातील मधले असल्याचे मानले जात आहे. फोर्डची इको स्पोर्टस, निस्सानची डस्टर, मारूतीची एस-क्रॉस आणि हुंदाईच्या क्रेटा या मॉडेल्सशी टियुव्ही ३०० टक्कर घेणार आहे. यात १.५ लिटर क्षमतेचे इंजिन आहे. या मॉडेलमध्ये सात जण आरामात प्रवास करू शकतात. याचे मायलेज १८.५ इतके असल्याचा दावा महिंद्रातर्फे करण्यात आला आहे.
Mahindra TUV 300 Rough & Tough. Best SUV by M&M.