अनेक उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज असणारा मोटो एक्स प्ले हा स्मार्टफोन लवकरच भारतात सादर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या वर्षाच्या जुलै महिन्यात भारतात तिसर्या पिढीचा मोटो जी हा स्मार्टफोन लॉंच करण्यात आला होता. त्याच दिवशी अमेरिकेत मोटो एक्स आणि मोटो एक्स स्टाईल हे मॉडेल लॉंच करण्यात आले होते. तेव्हापासूनच हा स्मार्टफोन भारतात कधी येणार याबाबत उत्सुकता लागून होती. अखेर मोटोरोलाने अधिकृत ट्विट करून याचा भारतातील आगमनाची वर्दी दिली आहे. याचा टिझर्स तसेच फिचर्स जाहीर झाले असले तरी मुल्य घोषित करण्यात आलेले नाही. अमेरिकेतील याचे मुल्य २९९ डॉलर्स अर्थात सुमारे ३० हजार रूपये आहेत. मात्र लिक्सनुसार हे मॉडेल २५ हजाराच्या आत सादर होणार असल्याचे संकेत आहेत. १४ सप्टेंबापासून हे मॉडेल भारतात लॉंच होत आहे.
मोटो एक्स प्ले या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एसओसी ८०१ ऑक्टॉ-कोअर प्रोसेसर आहे. याची रॅम दोन जीबी तर १६ व ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या दोन पर्यायांमध्ये मोटो एक्स प्ले येणार आहे. यात तब्बल २१ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. याची बॅटरी ३६३० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जीसह कनेक्टीव्हिटीचे अन्य पर्याय देण्यात आले आहेत.