युरेका प्लसची नोंदणी सुरू

0

मायक्रोमॅक्सच्या ‘यु’ या उपकंपनीने युरेका प्लस हे नवीन मॉडेल ९,९९९ रूपयांना सादर केले असून याची अमेझॉनवर नोंदणी सुरू झाली आहे.

yu-yureka_plus

‘यु’ कंपनीने काही महिन्यांपुर्वी सादर केलेल्या युरेका या स्मार्टफोनला भारतात उदंड प्रतिसाद मिळाला होता. याच मॉडेलमध्ये सुधारणा करून युरेका प्लस सादर करण्यात आला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा स्मार्टफोन सायनोजेन १२ या अँड्रॉईडमधूनच विकसित करण्यात आलेल्या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा आहे. ही प्रणाली अँड्रॉईडपेक्षाही अधिक गतीमान, उपयुक्त आणि नवनवीन फिचर्सनी युक्त आहे.

युरेका प्लसमधील अन्य फिचर्सही उत्तम आहेत. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल हाय डेफिनेशन प्रकारातील (१९२०*१०८०) डिस्प्ले देण्यात आला आहे. आधीच्या मॉडेलमध्ये फक्त एचडी स्क्रीन होता. याचा प्रोसेसर हा ६४ बीट १.५ गेगाहर्टझ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ ऑक्टॉकोअर चीपने युक्त आहे. याची रॅम दोन जीबी असून इंटरनल स्टोअरेज १६ जीबी आहे. ते मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येते. फुल एचडी क्षमतेची व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यास सक्षम असणारा याचा मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर समोरील कॅमेरा पाच मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. युरेका प्लस हा ड्युअल सीमची सुविधा असणारा स्मार्टफोन आहे. यात थ्री-जी, फोर-जी, ब्ल्यु-टुथ, जीपीएस आदी पर्याय देण्यात आले आहेत. यात २५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे.

युरेका प्लसचे मुल्य ९,९९९ रूपये इतके आहे. आजपासून फ्लिपकार्ट या ई-शॉपिंग पोर्टलवर याची नोंदणी सुरू झाली आहे. २४ जुलै रोजी दुपारी बारा वाजता याचा पहिला ‘फ्लॅश सेल’ होणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने याचे फ्लॅश सेल्स होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here