रिलायन्सचा ९९९ रूपयांत स्मार्टफोन !

0
reliance_jio

काही दिवसांपुर्वीच चार हजारात फोर-जी स्मार्टफोन देण्याची घोषणा करणार्‍या रिलायन्सने आता अवघ्या ९९९ रूपयांत प्राथमिक स्वरूपाचा स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले आहेत.

देशातील मोबाईल क्षेत्रात धमाका करण्यासाठी दोन्ही अंबानी बंधू एकत्र आले आहेत. फोर-जी क्रांतीवर स्वार होत रिलायन्स धमाल करणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या अनुषंगाने ही कंपनी अवघ्या चार हजार रूपयात फोर-जी स्मार्टफोन देणार असल्याचे वृत्त आपण ‘टेकवार्तावर’ वाचले होते. आता रिलायन्सने याहून धमाल करणारे माहिती दिली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स आणि डाटाविंड कंपनी संयुक्तपणे अवघ्या ९९९ रूपयांमध्ये स्मार्टफोन देणारा आहे. हा स्मार्टफोन लिनक्स या ओपनसोर्स ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा आणि टु-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारा असेल. हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असेल अशी माहिती देण्यात आली असली तरी याचे सर्व फिचर्स जाहीर करण्यात आलेले नाहीत. यावर बेसिक इंटरनेट सर्फींगसह फेसबुक, ट्विटर, व्हाटसऍप आदी वापरण्याची सुविधा असणार आहे. विशेष बाब म्हणजे यावर तब्बल १२ महिने मोफत इंटरनेटची सुविधादेखील देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन दिवंगत धिरूभाई अंबानी यांच्या जयंतीदिनी अर्थात २८ डिसेंबरला लॉंच करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

डाटाविंड ही कॅनडात मुख्यालय असणारी कंपनी किफायतशीर उपकरणांच्या निर्मितीसाठी ख्यात आहे. आधी ‘आकाश’ या टॅब्लेटमुळे ही कंपनी झोतात आली होती. आता रिलायन्ससोबत अवघ्या ९९९ रूपयांत स्मार्टफोन देण्यामुळे या कंपनीला पुन्हा प्रसिध्दी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here