रिलायन्स आणणार फोर-जी स्मार्टफोन

0
reliance_jio

रिलायन्स कंपनीने आज आपण स्वत: फोर-जी कनेक्टिव्हिटी असणारा ‘एलवायएफ’ या नावाने स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती दिली.

रिलायन्स इंडिस्ट्रीजची उपकंपनी असणारी ‘रिलायन्स रिटेल’ हा स्मार्टफोन लॉंच करणार आहे. रिलायन्स अत्यंत किफायतशीर दरात फोर-जी कनेक्टिव्हिटी असणारा स्मार्टफोन सादर करणार असल्याची चर्चा होती. एवढेच नव्हे तर ही कंपनी ग्राहकांना अल्प दरात फोर-जी सेवा देणार असल्याचेही मानले जात होते. या पार्श्‍वभुमिवर ‘एलवायएफ’ या नावाने नवीन मॉडेल सादर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात फोर-जी क्रांतीचे वारे वाहू लागले असतांनाच मुकेश आणि अनिल या अंबानी बंधूंच्या कंपन्यांनी एकत्र येण्याचा करार केला आहे. या अनुषंगाने रिलायन्स कंपनीची मालकी असणारे ‘जिओ इन्फोकॉम’ आणि अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनने करार केला आहे. या पार्श्‍वभुमिवर आता रिलायन्स कंपनीचा ‘एलवायएफ’ हा स्मार्टफोन बाजारपेठेत लोकप्रिय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हे मॉडेल ‘रिलायन्स रिटेल’सोबत अन्य ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. अर्थात कंपनीने अद्याप याची तांत्रीक माहिती आणि मुल्याबाबत माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here