लवकरच ओबीचा फायरफॉक्स स्मार्टफोन

0

नवी दिल्ली- मोझिलाची फायरफॉक्स ऑपरेटींग सिस्टिम असणारा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत उतरवण्याचे संकेत ओबी मोबाईल या कंपनीतर्फे देण्यात आले आहेत.

obi_mobile

मोझिला या विख्यात ओपनसोर्स कंपनीने तयार केलेल्या फायरफॉक्स या ऑपरेटींग सिस्टिमबद्दल उत्सुकतेचे वातावरण पसरले आहे. ही प्रणाली अँड्रॉईडला टक्कर देणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर अनेक कंपन्या या ऑपरेटींग सिस्टिमवर स्मार्टफोन लॉंच करण्यास तयार आहेत. यातच आता ओबी मोबाईल्स या कंपनीचे नाव जुडले आहे. ऍपलचे माजी सीइओ जॉन स्कुली यांच्या मालकीची कंपनी असणार्‍या ‘मोबी’ने भारतीय बाजारपेठेत फायरफॉक्सवर चालणारा स्मार्टफोन सादर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या फोनमध्ये ३.५ इंच एचव्हिजीए स्क्रीन डिस्प्ले, १ गेगाहर्डसचा प्रोसेसर, ड्युअल सीम, दोन मेगापिक्सलचा कॅमेरा, ब्लुटुथ, वायफाय आदी सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. हा कॅमेरा प्राथमिक स्वरूपाचा असला तरी तो याच सेगमेंटमधील स्पाईस आणि इंटेक्स या कंपनीच्या मुल्यापेक्षा जास्त असणार आहे. हा कॅमेरा या वर्षाच्या अखेरीस मार्केटमध्ये उतारण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here