कुलपॅड कंपनीतर्फे येत्या काही दिवसांमध्ये कुलपॅड नोट ५ हा स्मार्टफोन सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
कुलपॅड नोट ३, नोट ३ प्लस आणि नोट ३ लाईट या मॉडेलनंतर आता कुलपॅड नोट ५ येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा टिझरदेखील सादर करण्यात आला आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी ही मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे. ताज्या लीकनुसार यात ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१७ हा शक्तीशाली प्रोसेसर असेल. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असण्याची शक्यता आहे. याचा डिस्प्ले पाच संच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा असेल असेही मानले जात आहे. यात १३ वा १६ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधाही असेल. यात फोर-जी व्होओएलटीई सपोर्ट असेल. हे मॉडेल सुमारे १३ हजार रूपयांच्या आसपासच्या मूल्यात अमेझॉनवरून लाँच करण्यात येणार असल्याची माहितीदेखील मिळाली आहे.