लवकरच रेडमी मालिकेतील तीन मॉडेल्स भारतात मिळणार

0
xiaomi-redmi-6-pro,शाओमी रेडमी ६ प्रो,

शाओमीने लवकरच आपल्या रेडमी या मालिकेत रेडमी ६, रेडमी ६ ए आणि रेडमी ६ प्रो हे तीन नवीन मॉडेल्स लवकरच भारतीय बाजारपेठेत उतारण्याचे संकेत दिले आहेत.

शाओमीने काही दिवसांपूर्वी झालेल्या आपल्या ग्लोबल लाँचीग कार्यक्रमात रेडमी ६ व रेडमी ६ ए हे मॉडेल्स सादर केले आहेत. तर अलीकडेच रेडमी ६ प्रो मॉडेलही लाँच करण्यात आले आहे. हे तिन्ही मॉडेल्स लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत मिळाले आहेत.

यातील रेडमी ६ आणि रेडमी ६ ए या दोन्ही मॉडेल्समधील बहुतांश फिचर्स समान असून प्रोसेसरसह कॅमर्‍यांच्या क्षमतेत थोडा बदल करण्यात आला आहे. शाओमी रेडमी ६ या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा, फुल व्ह्यू या प्रकारातील तसेच एचडी प्लस म्हणजेच १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये हेलीओ पी २२ प्रोसेसर दिलेला आहे. याचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट उपलब्ध करण्यात आले आहेत. या दोन्ही व्हेरियंटमधील स्टोअरेज वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस १२ आणि ५ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे.

शाओमी रेडमी ६ ए या मॉडेलमध्ये डिस्प्ले तोच असला तरी हेलिओ ए २२ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १३ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून यातदेखील फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे.

शाओमी रेडमी ६ प्रो याचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज; ३ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज अशा तीन व्हेरियंटमध्ये सादर होऊ शकतो. या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये १२ मेगापिक्सल्सचा प्राथमिक कॅमेरा असून यात एफ/२.२ अपर्चर, पीडीएएफ आणि एलईडी फ्लॅश लाईटची सुविधा आहे. तर यातील दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून यात एचडीआर आणि एआय पोर्ट्रेट मोड प्रदान करण्यात आला आहे. याच्याच मदतीने यात ङ्गफेस अनलॉकफ हे फिचर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये मायक्रो-एसडी कार्डसाठी स्वतंत्र स्लॉट देण्यात आला आहे. यामुळे याचा ड्युअल सीमसह वापर करता येणार आहे.

शाओमी रेडमी ६ प्रो या मॉडेलमध्ये ५.८४ इंच आकारमानाचा, १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचे डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६२५ हा प्रोसेसर दिलेला आहे. तर यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. याचा लूक अतिशय आकर्षक असून यामध्ये आयफोन-एक्स या मॉडेलप्रमाणे वरील बाजूस नॉच प्रदान करण्यात आला आहे.

लवकरच शाओमी रेडमी ६ आणि शाओमी रेडमी ६ ए व शाओमी रेडमी ६ प्रो हे मॉडेलदेखील भारतात सादर करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here