लाव्हा पी ७ प्लसची घोषणा

0
lava-p7

लाव्हा कंपनीने आपला पी ७ प्लस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी ५६९९ रूपये मुल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.

गोल्ड आणि ग्रे रंगांमध्ये मिळणारे हे मॉडेल देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. अँड्रॉईडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे हे मॉडेल एक जीबी रॅम व आठ जीबी इनबिल्ट स्टोअरेजने युक्त आहे. याचा डिस्प्ले पाच इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा असेल. यातील कॅमेरे आठ आणि पाच मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. यात थ्री-जी नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here