लेईको (पुर्वाश्रमीची लेटिव्ही) या कंपनीने भारतात लेमॅक्स, लेमॅक्स सफायर आणि ले वन एस हे तीन स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत.
लेटिव्ही कंपनीने अलीकडेच लेईको हे नाव धारण केले आहे. आज या कंपनीने भारतात लेमॅक्स या मॉडेलचे दोन व्हेरियंटस तर ले वन एस असे एकंदरीत तीन स्मार्टफोन लॉंच केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लेमॅक्स या स्मार्टफोनबाबत चर्चा सुरू होती. आता हे मॉडेल भारतातही मिळणार आहे. लेमॅक्स स्मार्टफोन ३२,९९९, लेमॅक्स सफायर हे ६९,९९९ तर ले वन एस हे १०,९९९ रूपयांना ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
ले वन एसची नोंदणी सुरू झाली असून दोन फेब्रुवारीपासून ग्राहकांना मिळणार आहे. तर लेमॅक्स आणि लेमॅक्स सफायर १६ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. तिन्ही मॉडेल फक्त फ्लिपकार्ट या ऑनलाईन पोर्टलवरून मिळणार आहेत. ले वन एस हा एंट्री लेव्हलचा मात्र अतिशय उत्तम फिचर्सने सज्ज असा स्मार्टफोन आहे. याची रॅम तीन जीबी तर स्टोअरेज ३२ जीबी इतके आहे. यात खास मिरर फिंगरप्रिंट हे तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यात फास्ट चार्जींग सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. याची बॅटरी ३००० मिलीअँपिअर क्षमतेची असून यात टाईप सी रिव्हर्सीबल केबलसह फास्ट चार्जींगचे फिचर देण्यात आले आहे. १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे कॅमेरे देण्यात आले आहेत.
लेमॅक्स हे मॉडेल अतिशय उच्च फिचर्स असणारे आहेत. यात १४४० बाय २५६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनसह यात २१ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा दिलेला आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्स्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके देण्यात आले आहे. सोनी आयएमएक्स २३० सेन्सर, ड्युअल एलईडी फ्लॅश व एफ/२.० अपार्चरसह यात २१ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा दिलेला आहे. तर यात ४ अल्ट्रापिक्सल्स क्षमतेचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे. याची बॅटरी ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. तर लेमॅक्स सफायर या मॉडेलमध्ये लेमॅक्सप्रमाणेच सर्व फिचर्स असून यात फक्त १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज दिलेले आहे.