लेनोव्हो व्हाईब एक्स ३ भारतात उपलब्ध

0

लेनोव्हो कंपनीने आपला व्हाईब एक्स ३ हा स्मार्टफोन भारतात १९,९९९ रूपयांना सादर केला आहे.

लेनोव्हो व्हाईब एक्स ३ हे मॉडेल ३२ आणि ६४ जीबी स्टोअरेजच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. यापैकी भारतात फक्त ३२ जीबी क्षमतेचे मॉडेल लॉंच करण्यात आले आहे. दि. २८ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेपासून हे मॉडेल ‘अमेझॉन इंडिया’च्या पोर्टलवर मिळणार आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात सोनी आयएमएक्स २३० सेन्सरयुक्त तब्बल २१ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. फेज डिटेक्शन आणि ऑटो-फोकस सुविधांसह असणारा हा कॅमेरा तब्बल फोर-के क्षमतेचे व्हिडीओ छायाचित्रण करण्यास सक्षम आहे. तर यात सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात स्नॅपड्रॅगन ८०८ हेक्झा-कोअर प्रोसेसर असून याची रॅम तीन जीबी इतकी आहे. याची बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

लेनोव्हो व्हाईब एक्स ३ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास थ्रीचे संरक्षक आवरण आहे. यात मुख्य कॅमेर्‍याच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनरही दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here