‘वन प्लस वन’ लवकरच भारतात

0

उच्च श्रेणीतील फिचर्स किफायतशीर किंमतीत देणारा ‘वन प्लस वन’ हा चीनी स्मार्टफोन लवकरच भारतात पदार्पण करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

२०१४ या वर्षात सॅमसंग, ऍपल, एचटीसी, एलजी आदींसारख्या मातब्बर कंपन्यांना चीनी कंपन्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. यात चीनची ऍपल म्हणून विख्यात झालेल्या शिओमी कंपनीने एमआय-३ व एमआय-४ फोनच्या माध्यमातून धमाल उडवून दिली आहे. भारतात नुकताच सादर झालेल्या एमआय-३ या स्मार्टफोनला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिओमीच्या पाठोपाठ आता ‘वन प्लस वन’ हा स्मार्टफोन भारतात आगमनासाठी सज्ज One-Plus-Oneझाला आहे. चीनसह अमेरिका आणि युरोपात काही महिन्यांपुर्वी लॉंच झालेल्या ‘वन प्लस वन’ या स्मार्टफोनने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. अत्यंत किफायतशील मुल्यात दणकेबाज फिचर्स ही त्याची खासियत आहे.

‘वन प्लस वन’ या स्मार्टफोनमध्ये तब्बल तीन जीबी मेमरी देण्यात आली असून तो १६ आणि ६४ जीबी क्षमतेच्या दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसरवर चालणार्‍या या स्मार्टफोनमध्ये गोरिला ग्लास थ्रीचे प्रोटेक्शन असणारा ५.५ इंच फुल एचडी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सलचा व सहा लेन्स असणारा कॅमेरा आहे. समोरच्या बाजूस पाच मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन ‘सायनोजेनमॉड’ या अँड्रॉईडपासूनच विकसित केलेल्या ऑपरेटींग सिस्टिमवर चालतो. यात फोर-जी नेटवर्कसह वायफाय, ब्लुटुथ आदी सर्व कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. एका अर्थाने हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सुलभ वापर या तिन्ही बाबींमध्ये हा स्मार्टफोन उजवा आहे. याचमुळे हा स्मार्टफोन जेथेही लॉंच करण्यात आलाय तेथे धमाल करत आहे. या पार्श्‍वभुमीवर येत्या काही दिवसांत ‘वन प्लस वन’ भारतात सादर करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत ‘वन प्लस वन’ हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी त्या कंपनीकडून आमंत्रणाचा कोड मिळवण्याची काहीशी किचकट प्रक्रिया आहे. याऐवजी सुलभ पध्दतीने ‘फ्लिपकार्ट’, ‘स्नॅपडील’ वा अमेझॉनसारख्या वेबसाईटवरून हा स्मार्टफोन भारतात विक्रीची योजना असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे ‘वन प्लस वन’चे १६ जीबीचे मॉडेल हे २९९ डॉलर्स तर ६४ जीबी मॉडेल ३४९ डॉलर्सला उपलब्ध आहे. याचाच अर्थ असा की, १८ ते २२ हजार रूपयांच्या किंमतपट्ट्यात हा उच्च श्रेणीतील फिचर्स असणारा स्मार्टफोन मिळणार असल्याने भारतीय बाजारपेठेत तो धमाल करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here