विकीपेडियाने आता कोणताही मजकूर सहजपणे ध्वनीत परिवर्तीत करणारी प्रणाली विकसित केली आहे. याचा दृष्टीहिनांना लाभ होणार आहे.
विकीपेडियाचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. अर्थात दृष्टीने अधू असणार्यांना याचा लाभ घेता येत नाही. नेमकी हीच अडचण लक्षात घेत आता यावर टेक्स्ट-टू-स्पीच ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासाठी स्वीडनमधील ‘केटीएच रॉयल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेचे सहकार्य घेतले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये इंग्रजी, अरेबिक आणि स्वीडीश भाषांसाठी हे तंत्रज्ञान वापरात येणार आहे. यानंतर क्रमाक्रमाने अन्य भाषांसाठी याला सादर करण्यात येणार आहे.