वॉकमन नव्हे स्मार्टफोन !

0

सोनी कंपनीने आपल्या वॉकमनची हुबेहुब प्रतिकृतीसमान डिझाईन असणारा नवा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.

मानवी इतिहासात वॉकमनला मानाचे स्थान आहे. ऐशीच्या दशकात हा लहानशा उपकरणाने वैयक्तीकरित्या संगीताचा आनंद लुटण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. काळाच्या ओघात वॉकमन नाहीसा झाला. प्रारंभी पर्सनल म्युझिक प्लेअर्स आणि नंतर स्मार्टफोनच्या प्रचारामुळे वॉकमन काळाच्या पडद्याआड गेला. अर्थात सोनी कंपनीने आपल्या या लिजंडरी प्रॉडक्टच्या आठवणीसाठी याच्याच प्रतिकृतीमध्ये स्मार्टफोन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अनुषंगाने सोनी कंपनीने टिपीएस एलटू हे नवीन मॉडेल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. टिपीएस एलटू हे सोनी वॉकमनच्या मॉडेलचे नाव होते. याची आठवण म्हणून या स्मार्टफोनलाही हेच नाव देण्यात आले आहे. हा दिसायला अगदी त्या वॉकमनप्रमाणेच आहे. यात दोन्ही बाजूचे कॅमेरे तर एका बाजूला युएसबी कनेक्टर दिलेले आहे.

Sony-TPS-L2-smartphone1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here