व्हिडीओकॉनचा स्वस्त ‘व्हि फोन ग्रँड’

0

बीएसएनएलने स्वस्त भारत फोन सादर केल्यानंतर आता व्हिडीओकॉन कंपनीने अवघ्या १९५० रूपयात स्वस्त ‘व्हि फोन ग्रँड’ बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

भारतात स्मार्टफोनची बाजारपेठ प्रचंड वेगाने विस्तारत आहे. यात एंट्री लेव्हलपासून ते फ्लॅगशिप फोनपर्यंत अनेक मॉडेल्स लोकप्रिय झाले आहेत. मात्र भारतीय बाजारपेठेत किफायतशीर फोन्स आजही लोकप्रिय आहेत. किंबहुना महाग स्मार्टफोन न परवडणारा एक मोठा वर्ग आहे. याच वर्गाला लक्षात ठेवत भारत संचार निगम लिमिटेडने भारत फोन हा स्वस्त फोन सादर केला होता. आता व्हिडीओकॉन कंपनीनेही अवघ्या १९५० रूपयामध्ये ‘जावा’वर आधारित आपला ‘व्हि फोन ग्रँड’ लॉंच करण्याची घोषणा केली आहे.

२.८ इंच क्युव्हिजीए स्क्रीन असणार्‍या या फोनच्या स्क्रीनवर मोठ्या फॉंटच्या सहाय्याने मेन्यू देण्यात आला आहे. हा फोन भारताच्या ग्रामीण भागाला लक्षात ठेवून तयार करण्यात आला आहेे. परिणामी स्क्रीनवर मराठीसह सहा भाषांची निवड करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात १.३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून यात मुव्ही ज्युक बॉक्स ऍप्लिकेशन, सिक्युरिटी इनबॉक्स, स्मार्ट ऑटो कॉल रेकॉर्डींग, स्मार्ट डायव्हर्ट आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. सहसा दोन हजार रूपयापर्यंतच्या फोनमध्ये अशा स्वरूपाच्या सुविधा नसल्याने हा फोन लोकप्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

videocon_vphone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here