व्हिव्हो वाय ६६ची घोषणा

0

व्हिव्हो कंपनीने मध्यम किंमतपट्टयातील वाय ६६ या मॉडेलची घोषणा केली आहे. हे मॉडेल आधीच कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आले होते.

अलीकडेच व्हिव्होच्या वेबसाईटवर वाय६६ आणि वाय६६एल हे दोन मॉडेल दिसून आले होते. यापैकी आता वाय६६ या मॉडेलवर कंपनीने अधिकृत शिक्कामोर्तब करत याला बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. चीनमध्ये हे मॉडेल १४९८ युऑन म्हणजेच सुमारे १४,६१० रूपयांना मिळणार आहे. यात ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर असून याची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असेल. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि ७२० बाय १२८० म्हणजेच एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले असेल. हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो प्रणालीवर चालणारे असून यावर कंपनीचा फनटच ३.० युजर इंटरफेस असेल. तसेच यात क्विकचार्ज २.० या तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. यातील कॅमेरे १३ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असून यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here