व्हिव्हो कंपनीचे व्हिव्हो व्हि ५ हे मॉडेल आता ‘लाईट’ या नवीन व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्यात आले असून याची लिस्टींग करण्यात आली आहे.
व्हिव्हो व्हि ५ हा स्मार्टफोन अतिशय उत्तम सेल्फी कॅमेर्यासाठी ख्यात झाला आहे. आता याचे ‘व्हिव्हो व्हि ५ लाईट’ या नावाने नवीन व्हेरियंट येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ‘ओन्ली मोबाईल्स’ या संकेतस्थळावर या मॉडेलची १५८९० रूपये मुल्यात लिस्टींग झाली आहे. व्हिव्हो व्हि ५ हे मॉडेल आधीच १७८९० रूपयात सादर करण्यात आले असून ही कंपनी २३ जानेवारी रोजी व्हिव्हो व्हि ५ प्लस हे मॉडेल लॉंच करणार आहे. याआधीच ‘लाईट’ आवृत्तीची लिस्टींग झाली आहे हे विशेष. यानुसार संबंधीत मॉडेलमध्ये ५.५ इंच आकाराचा आणि एचडी क्षमतेचा २.५ डी आयपीएस डिस्प्ले व यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. याची रॅम ३ जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यातही आधीच्या मॉडेलप्रमाणेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला असून मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो प्रणालीवर आधारित फनटच ३.० ओएसवर चालणारे असेल.