शिओमीचा नवीन स्मार्ट टिव्ही

0

शिओमी या चिनी कंपनीने बाजारपेठेत किफायतशीर दरात ६० इंच आकारमानाचा आणि फोर-के क्षमतेचा एमआय टिव्ही थ्री सादर करण्याची घोषणा केली आहे.

शिओमी कंपनी अलीकडच्या काळात आपल्या उत्पादनांचा विस्तार करत आहे. आपल्या उपकरणांमध्ये वैविध्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या पार्श्‍वभुमिवर या कंपनीने नुकताच फोर-के क्षमतेचा एमआय टिव्ही थ्री लॉंच केला आहे. याचा डिस्प्ले ६० इंच आकारमानाचा आहे. मेटल फ्रेम असणारा हा टिव्ही अवघ्या ११.६ मिलीमीटर इतक्या जाडीचा आहे. हा टिव्ही ३८४० बाय २१६० अर्थात फोर-के या क्षमतेचा चित्रीकरण दर्शविण्यास समर्थ आहे. मात्र यात थ्री-डी सपोर्ट देण्यात आलेला नाही.

एमआय टिव्ही थ्री यामध्ये एचडीएमआय, युएसबी, इथरनेट, एव्ही आणि आरएफ आदी कनेक्टीव्हिटीचे पर्याय दिलेले आहेत. हा टिव्ही सादर करत असतांना शिओमीने एमआय टिव्ही बारदेखील लॉंच केला आहे. यात एमस्टार ६ए९२८ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट आठ जीबी इतके स्टोअरेज आहे. हा टिव्ही बार कोणत्याही टिव्हीला जोडल्यानंतर तो स्मार्ट टिव्हीमध्ये परिवर्तीत होतो. शिओमीची टिव्ही ८८० तर टिव्ही बार १५७ डॉलर्सला उपलब्ध होणार आहे. अर्थात इतक्या कमी मुल्यात ६० इंची फोर-के टिव्ही प्रथमच सादर करण्यात आल्याने याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here