शिओमीचा पुन्हा धमाका

0

चीनची ऍपल कंपनी म्हणून ख्यात पावलेल्या शिओमीने एमआय४ हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन अत्यंत किफायतशील दरात उपलब्ध करून धमाल उडवून दिली आहे.

mi4

२०१४च्या पुर्वार्धात जोरदार मुसंडी मारत शिओमी (xiaomi) या चीनी कंपनीने अवघ्या जगाचे लक्ष आकर्षित केले आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात या कंपनीचे तब्बल अडीच करोडपेक्षा जास्त स्मार्टफोन विकले गेले आहेत. गेल्या आठवड्यातच या कंपनीने भारतात जोरदार पदार्पण केले आहे. त्यांनी भारतात एमआय३, रेडमी नोट व रेडमी एस ही उत्पादने लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एमआय३ या स्मार्टफोनचा पहिला स्टॉक तर ‘फ्लिपकार्ट’वर अवघ्या चाळीस मिनिटात संपला. हे होत असतांना शिओमीच्या वतीने बीजींगमध्ये एका शानदार कार्यक्रमात एमआय४ हे नवीन मॉडेल सादर करण्यात आले.

एमआय४ मध्ये पाच इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात २.५ गेगाहर्टझ क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असून याची रॅम तब्बल तीन जीबी इतकी आहे. हा स्मार्टफोन १६ आणि ६४ जीबी क्षमतेच्या इंटरनल स्टोअरेज असणार्‍या दोन प्रकारात उपलब्ध आहे. याला मागील बाजूस १३ तर समोरच्या बाजूने आठ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी क्षमता ३०८०(०) इतकी आहे. हा फोन वायफाय, फोरजी नेटवर्कवर चालतो. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात मेटल फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे जगातील या सर्वात वेगवान स्मार्टफोनचे मुल्य हे अगदी किफायतशीर असेच आहे. याचे १६ जीबीचे मॉडेल हे ३२० तर ६४ जीबीचे मॉडेल ४०० डॉलर्सला उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्झी एस५, एलजी जी३, आयफोन ५सी व एस आदी उच्च श्रेणीतील मॉडेल्सपेक्षा हे मुल्य अत्यंत कमी असेच आहे. २९ जुलैपासून हा फोन चीनी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. यानंतर हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहे. याचा लुक हा बराचसा आयफोन ५ वा ५एस प्रमाणे दिसतो. यातच स्वस्त मुल्यामुळे हा सॅमसंग, आयफोन, एलजी, एचटीसी आदी कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला आव्हान देण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here