शिओमीच्या स्वस्त पॉवर बँक

0

शिओमी या कंपनीने भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून अत्यंत किफायतशीर दरात दोन पॉवर बँक उपलब्ध केल्या असून याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

सध्या स्मार्टफोनचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कधी काळी मोबाईल हा फक्त संपर्काचे साधन होता. आज इंटरनेट सर्फींगपासून विविध कामे याच्याच माध्यमातून होत आहेत. यामुळे कितीही चांगल्या क्षमतेची बॅटरी लवकर संपण्याची समस्या आपल्या सर्वांना भेडसावते. यात सोबत उर्जा स्त्रोत असल्यास अडचण येत नाही. मात्र आपण बाहेर असल्यास चांगलीच गोची होते. यामुळे अलीकडच्या काळात पोर्टेबल चार्जींगसाठी ‘पॉवर बँक’ चांगल्याच batteryलोकप्रिय झाल्या आहेत. अर्थात सद्यस्थितीत उत्तम ब्रँडसच्या पॉवर बँक या काहीशी महागड्या आहेत. या पार्श्‍वभुमीवर आज शिओमी या चिनी कंपनीने ‘एमआय’ श्रेणीत फ्लिपकार्टवर दोन पॉवर बँक उपलब्ध केल्या आहेत. या दोन्ही पॉवर बँक्सला मेटॅलिक फिनिशिंग करण्यात आले असून ते जल व गंजरोधक आहे.

यातील १०४०० एमएएच (मिली-अँपीअर अवर) क्षमतेची ९९९ तर ५२०० एमएएच क्षमतेची ७९९ रूपयांना उपलब्ध करण्यात आली. फ्लिपकार्टवर ही उत्पादने आल्यानंतर काही मिनिटातच ती संपली. यामुळे हे वृत्त आपण वाचत असतांना फ्लिपकार्टवर ही उत्पादने ‘आऊट ऑफ स्टॉक’ होती. शिओमी कंपनीच्या एमआय-३ या स्मार्टफोनलाही असाच जोरदार प्रतिसाद मिळाला असून येत्या काही दिवसांत ‘रेड मी १एस’ व ‘रेडमी नोट’ ही उत्पादने अनुक्रमे ६,९९९ व ९,९९९ रूपये या मुल्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here