शिओमी एमआय४ डिसेंबरमध्ये येणार

0

एमआय३च्या अभुतपुर्व यशानंतर शिओमी कंपनी आपला दणदणीत फिचर्स असणारा एमआय४ हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये भारतात लॉंच करण्याचे संकेत मिळाले आहेत.

Xiaomi-Mi4

‘चीनची ऍपल’ म्हणून शिओमी कंपनी विख्यात आहे. शिओमीने भारतात एमआय३ हे स्मार्टफोन नुकताच फ्लिपकार्टच्या माध्यमातून सादर केला आहे. याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. फ्लिपकार्टवर एमआय३चे मॉडेल्सच्या स्टॉक काही सेकंदांमध्ये संपत आहे. ज्या ग्राहकांनी एमआय३चा वापर केला ते यातील किफातयतशीर मुल्यात मिळालेल्या दर्जेदार सुविधांनी खुश झालेली आहेत. या पार्श्‍वभुमीवर आता शिओमी कंपनी आपला नुकताच चीनमध्ये सादर केलेला एमआय४ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करणार आहे.

शिओमी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट (इंटरनॅशनल अफेयर्स) ह्युगो बारा यांनी एका भारतीय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. शिओमी कंपनीच्या एमआय३ला जोरदार यश मिळाल्यानंतर आता स्वस्त श्रेणीतील रेडमी १एस व रेडमी नोट ही उत्पादने लॉंच करण्यात येणार आहेत. यानंतर साधारणत: डिसेंबरमध्ये एमआय४ भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. चीनमध्ये या स्मार्टफोनने अक्षरश: धमाल केली आहे. एमआय४ मध्ये पाच इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात २.५ गेगाहर्टझ क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असून याची रॅम तब्बल तीन जीबी इतकी आहे. हा स्मार्टफोन १६ आणि ६४ जीबी क्षमतेच्या इंटरनल स्टोअरेज असणार्‍या दोन प्रकारात उपलब्ध आहे. याला मागील बाजूस १३ तर समोरच्या बाजूने आठ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन वायफाय, फोरजी नेटवर्कवर चालतो. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात मेटल फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. अत्यंत किफायतशीर मुल्यात ऍपल आणि सॅमसंगच्या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनसारखी फिचर्स यात देण्यात आलेली आहेत. यामुळे भारतीय ग्राहकांचीही याला पसंती मिळणार असल्याचा आशावादा ह्युगो बारा यांनी प्रकट केला आहे. याचे मुल्य १८ ते २५ हजारादरम्यान असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here