शिओमी कंपनीने आज सिंगापुरमध्ये आपल्या रेडमी टू या बजेट वर्गवारीतील स्मार्टफोनचे इनहान्स्ड हे नवीन व्हर्शन लॉंच केले आहे.
शिओमी रेडमी टू हा बजेट स्मार्टफोन सर्वत्र धमाल करत आहे. भारतात याचे नुकतेच मुल्यदेखील एक हजार रूपयांनी कमी करण्यात आले आहे. यातच आज कंपनीने सिंगापुरमध्ये शिओमी रेडमी टू इनहान्स्ड हे याच मॉडेलचे नवीन व्हर्शन सादर केले आहे. याची रॅम दोन जीबी तर इंटरनर स्टोअरेज १६ जीबी आहे. हे मूळ मॉडेलच्या दुप्पट आहे. मात्र अन्य सर्व फिचर्स समान आहेत.
शिओमी रेडमी टू हा स्मार्टफोन १४९ सिंगापूर डॉलर्सला लॉंच करण्यात आला होता. तर नवीन मॉडेल १७९ सिंगापूर डॉलरचा मिळणार आहे. भारतात अद्याप हा स्मार्टफोन केव्हा लॉंच होणार याबाबत शिओमी कंपनीतर्फे अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र भारतात हे मॉडेल सुमारे सात हजार रूपयांच्या आसपास लॉंच होण्याची शक्यता आहे. या मुल्यात दोन जीबी रॅमचा स्मार्टफोन धमाल करण्याची शक्यता आहे.