शिओमी लवकरच भारतात

0

चीनची ‘ऍपल’ म्हणून विख्यात असणारी शिओमी लवकरच भारतात कंपनी लवकरच भारतात पदार्पण करत असल्याचे वृत्त आहे. फ्लिपकार्टच्या मदतीने येत्या काही महिन्यात दोन स्मार्टफोन लॉंच करण्याचे संकेत मिळाले आहेत.

शिओमीची स्थापना २०१० साली ली जून या अभियंत्याने स्थापना केली होती. अल्पावधीतच स्मार्टफोन, ऍप्स तसेच गृहोपयोगी उपकरणांच्या निर्मितीत या कंपनीने ख्याती मिळवली आहे. यातील ‘एमआय’ या मालिकेतील स्मार्टफोन लोकप्रिय ठरले आहेत. या कंपनीने चीनमध्ये दीड कोटीपेक्षा स्मार्टफोन्सची विक्री केली आहे. यापुर्वी भारतात लिनेव्हो, जिओनी, हुवेई, झेडटीई, ओप्पो आदी कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या पार्श्‍वभुमीवर आता शिओमीचेही भारतात आगमन होत आहे.

सध्या भारतावर जगातील तमाम स्मार्टफोन उत्पादकांचे लक्ष आहे. या पार्श्‍वभुमीवर शिओमीदेखील भारतात पदार्पण करत आहे. लवकरच त्यांच्यातर्फे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात येणार आहेत. हे हँडसेट ‘फ्लिपकार्ट’च्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होणार असले तरी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

mi_phone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here