सॅमसंगचा दोन डिस्प्ले असणारा स्मार्टफोन

0

सॅमसंग कंपनीने दोन डिस्प्ले असणारा डब्ल्यू२०१६ हा नवीन स्मार्टफोन लॉंच करण्याची घोषणा केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंग कंपनी ड्युअल डिस्प्ले असणारा स्मार्टफोन सादर करणार असल्याची चर्चा सुरू होती. याचे फिचर्स लीक झाले होते. तसेच याचे नाव ‘गॅलेक्सी गोल्डन थ्री’ असेल असा दावा करण्यात आला होता. मात्र सॅमसंगच्या चीनी वेबसाईटवरील माहितीनुसार याच्या फिचर्सची माहिती खरी ठरली असली तरी याचे नाव ‘डब्ल्यू२०१६’ हे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सॅमसंग डब्ल्यू२०१६ हा स्मार्टफोन ३.९ इंच आकारमानाच्या आणि १२८० बाय ७६८ पिक्सल्स क्षमतेच्या दोन सुपर अमोलेड डिस्प्लेंनी सज्ज आहे. याची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फोर-जी व थ्री-जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारा आहे. याची बॅटरी २,००० मिलीअँपीअर क्षमतेची असणार आहे. तर तो लॉलीपॉप प्रणालीवर चालणार आहे.

वरील फिचर्स पाहता हा स्मार्टफोन फ्लॅगशीप अर्थात उच्च श्रेणीतला असल्याचे स्पष्ट आहे. अर्थात तो १५६५ डॉलर्स इतक्या उच्च मुल्यात सादर करण्यात आला आहे. मात्र दोन स्क्रीनच्या आकर्षणामुळे तो लोकप्रिय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आधी चीनमध्ये हा स्मार्टफोन लॉंच करण्यात येणार असून नंतर क्रमाक्रमाने जगातील अन्य राष्ट्रांमध्ये त्याला सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here