सॅमसंग आणणार घडी होणार्‍या डिस्प्लेचा स्मार्टफोन

0

सॅमसंग कंपनीने चक्क घडी होणार्‍या डिस्प्लेचा स्मार्टफोन तयार केला असून हे मॉडेल जानेवारी महिन्यात ग्राहकांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

samsung_folding_phone

स्मार्टफोन निर्मितीतील अत्यंत जीवघेण्यास स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विविध कंपन्या वेगवेगळ्या शक्कली लढवत असतात. या अनुषंगाने आता सॅमसंग कंपनीचे चक्क घडी होणार्‍या डिस्प्लेचा स्मार्टफोन तयार केला आहे. फुल एचडी क्षमतेच्या या डिस्प्लेमध्ये विशिष्ट प्रकारचे प्लास्टीक मिक्स केल्यानंतर त्याची घडी करता येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सॅमसंगच्या विविध उत्पादनांबाबत अचूक भाकिते करण्यासाठी ख्यात असणार्‍या ‘सॅम मोबाईल’ या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर माहिती प्रसिध्द केली आहे.

यानुसार सॅमसंग कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६२० अथवा ८२० प्रोसेसर असणार आहे. याची रॅम तीन जीबी, इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी तर यातील बॅटरी ही विलग न करण्याजोगी असेल असेही ‘सॅम मोबाईल’चे म्हणणे आहे. येत्या जानेवारी महिन्यात सॅमसंग कंपनी आपले हे नवीन मॉडेल सादर करणार असल्याचेही यात नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here