सॅमसंग एसटू टॅब सादर

0

सॅमसंग कंपनीने आपला एसटू टॅब सादर केला आहे. हा जगात वजनाने सर्वात हलका व पातळ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

samsungtabs2

सॅमसंग कंपनीने आज जागतिक बाजारपेठेत आठ इंच आणि ९.७ इंच या दोन आकारमानांमध्ये एसटू टॅब सादर केला आहे. हा टॅब अवघा ५.६ मिलीमीटर जाड आहे. यात अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

सॅमसंग एसटू टॅबमध्ये तीन जीबी रॅम तर ३२ व ६४ जीबी इंटरनल स्टोअरेजचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ते मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील मुख्य कॅमेरा आठ तर समोरील कॅमेरा २.१ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यातील ९.७ इंच आकारमानाच्या सॅमसंग एसटू टॅबमध्ये ५८७० तर आठ इंच आकारमानाच्या मॉडेलमध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हे दोन्ही टॅब अँड्रॉईडच्या ५.० व्हर्शनवर चालणारे आहेत. तर कनेक्टीव्हिटीचे एलटीई, वाय-फाय व ब्ल्यु-टुथ आदी पर्याय देण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात हे दोन्ही टॅब जागतिक बाजारपेठेत उतरवण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here