‘सॅमसंग गॅलेक्झी एस ५’चे फोर जी मॉडेल

0

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने आपल्या ‘गॅलेक्झी एस ५’ या मॉडेलचे फोर जी व्हर्शन ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. एलजीनंतर फोर जी मॉडेल लॉंच करून सॅमसंगने आपण स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

Samsung-Galaxy-4G

देशात लॉंच करण्यात आलेले वा नुकतेच बाजारात येणारे बहुतांश स्मार्टफोन हे थ्री जी या कनेक्टीव्हिटीच्या तंत्रज्ञानावर चालतात. देशात आता फो जी या टेक्नॉलॉजीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक मोबाईल कंपन्यांनी ही सेवा देऊ केली आहे. या पार्श्‍वभुमीवर ‘सॅमसंग गॅलेक्झी एस ५’चे फोर जी मॉडेल आता लॉंच करण्यात आले आहे. यात २.५ गेगाहर्टझ क्षमतेचा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात फुल एचडी क्षमता असणारा ५.१ अमोलेड डिस्प्ले असून हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या ४.४ किटकॅट व्हर्शनवर चालतो. याच्या स्क्रीनवर टचविझ युजर इंटरफेसचे आवरण लावण्यात आल्याने याचा लूक अधिक आकर्षक झाला आहे. याची मेमरी दोन जीबी असून स्टोअरेज १६ जीबी देण्यात आले असून ते ६४ जीबीपर्यंत वाढवणे शक्य आहे. यात ४ के क्षमतेची व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यास सक्षम असणारा १६ मेगापिक्सल कॅमेरा असून समोरच्या बाजूने २.१ मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे. यात दोन अंतर्गत वायफाय अँटेना देण्यात आले आहेत. याच्या मदतीने कनेक्टीव्हिटी चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. या मॉडेलचे मुल्य ५३,५०० इतके ठेवण्यात आले आहे. या स्मार्टफोनसोबत एयरटेलचे विद्यमान फोर जी ग्राहक असणार्‍यांना महिन्याला पाच जीबी डाटा मोफत देण्यात येणार आहे.

सॅमसंगची प्रतिस्पर्धी असणार्‍या एलजी कंपनीने काही दिवसांपुर्वीच आपल्या ‘जी२’ या मॉडेलचे फोर जी व्हर्शन लॉंच केले होते. या पार्श्‍वभुमीवर सॅमसंगने आपले फोर जी मॉडेल ग्राहकांना सादर केले ही बाब लक्षणीय आहे. भारतात सध्या फ्लॅगशीप या प्रकारात ‘सॅमसंग गॅलेक्झी एस ५’सह एलजी जी२, आयफोन ५ सी, एचटीसी वन एम८ आदी पर्याय उपलब्ध आहेत. देशात सध्या एयरटेल आणि एयरसेल या दोन कंपन्याच फोर जी सेवा पुरवत आहेत. ‘रिलायन्स जीओकॉम’ने पुढील वर्षी फोर जी सेवा पुरवण्याची घोषणा केली आहे. अन्य कंपन्यादेखील या क्षेत्रात लवकरच उतरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठेत आयफोन ५सी व ५एस, एलजी जी२ फोरजी, झोलो एलटी ९००, एचटीसी वन एम८ व ओप्पो फाइंड ७ हे स्मार्टफोन फोर जी नेटवर्कवर चालणारे आहेत. यात आता ‘सॅमसंग गॅलेक्झी एस ५’ची भर पडणार असून या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here