सॅमसंग ‘गॅलेक्सी एस ५ मीनी’ची घोषणा

0

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेल्या ‘गॅलेक्सी एस ५ मीनी’ची घोषणा आज सॅमसंगतर्फे करण्यात आली आहे.

सॅमसंग ही कंपनी आपल्या उच्च श्रेणीतील बहुतांश फिचर्स त्यापेक्षा कमी मुल्यात ग्राहकांना ‘मीनी’ या वर्गवारीत देत असते. या अनुषंगाने गॅलक्सी एस ५ हा स्मार्टफोन बाजारपेठेत आला तरी त्याचे मिनी व्हर्शन अद्याप आले नव्हते. या अनुषंगाने आज सॅमसंगतर्फे लवकरच हे मॉडेल उपलब्ध होणार असल्याची माहिती जारी केली. यात ४.५ इंच ७२०*१२८९ सुपल अमोलेडे डिस्प्ले देण्यात आला आहे. १.४ गेगाहर्टझ क्वाड कोअर प्रोसेसरवर चालणार्‍या या मॉडेलची रॅम १.५ जीबी तर इंटरनल मेमरी १६ जीबी इतकी देण्यात आली आहे. ही मेमरी ६४ जीबीपर्यंत वाढविता येणे शक्य आहे.

या कॅमेर्‍यात मागच्या बाजूला एलईडी फ्लॅशसह आठ मेगापिक्सलचा कॅमेरा असून पुढील बाजूस २.१ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये एस ५च्या अन्य सुविधादेखील देण्यात आल्या आहेत. यात हा स्मार्टफोन डस्ट व वॉटरप्रुफ आहे. याशिवाय यात फिंगरप्रिंट व हार्टबीट रेट सेन्सर्स देण्यात आले आहेत. तसेच याच सुपर पॉवर सेव्हींग मोडची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल सर्वप्रथम रशियात लॉंच करण्यात येणार असून नंतर ते भारतासह अन्य देशांमध्ये सादर करण्यात येणार असल्याची माहिती आज सॅमसंगतर्फे जाहीर करण्यात आली.

s5_mini

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here