सॅमसंग गॅलेक्सी ए एट सादर

0

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी ए श्रेणीतील ए-एट हा स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला आहे. हा कंपनीचा आजवरचा सर्वात सडपातळ मोबाईल आहे.

गेल्या काही दिवसांपासून सॅमसंग गॅलेक्सी ए एट या स्मार्टफोनबाबत जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. आधी या मॉडेलचे फिचर्स लीक झाले. यानंतर याच्या लॉंचिंगबाबत चर्चा सुरू झाली. मात्र हे सारे होत असतांना सॅमसंग कंपनीने चीनमध्ये गॅलेक्सी ए एट सादर करून या उत्सुकतेला पुर्णविराम दिला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए एट या स्मार्टफोनला मेटलची फ्रेम देण्यात आली आहे. परिणामी याचा लुक एस सिक्सशी सुसंगत आहे. फक्त ५.९ मिलीमीटर जाड असणारे हे मॉडेल सॅमसंगचे आजवरचे सर्वात सडपातळ आहे. ५.७ इंच आकारमानाचा फुल एचडी डिस्प्ले असणार्‍या या मॉडेलचे वजन १५१ ग्रॅम इतके आहे. यात स्पॅनड्रॅगन क्वॉलकॉम ६१५ एसओसी प्रोसेसर आहे. याची रॅम दोन जीबी तर इंटरनल स्टोअरेजचे १६ व ३२ जीबी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यात मायक्रो एसडी कार्डची सुविधा असल्याने स्टोअरेज वाढविणे शक्य आहे. अर्थात मायक्रोएसडी कार्ड व दुसरे सीम याचे सॉकेट शेअर करण्यात आल्यामुळे या दोघांपैकी एकाचाच वापर करणे शक्य असल्याची थोडी उणीव या मॉडेलमध्ये आहे.

कनेक्टीव्हिटीचा विचार करता सॅमसंग गॅलेक्सी ए एटमध्ये फोर-जी, ड्युअल बँड वाय-फाय, ब्ल्यु-टुथ ४.१, जीपीएस, एनएफसी आदी पर्यात देण्यात आले आहेत. याचा प्रमुख कॅमेरा १६ तर समोरील पाच मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. अँड्रॉईडच्या ५.१ अर्थात लॉलिपॉप व्हर्शनवर चालणार्‍या या स्मार्टफोनमध्ये ३०५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग कंपनी सर्वप्रथम चीनमध्ये हा स्मार्टफोन सादर करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here