स्नॅपडीलचीही मोबाईल वेबसाईट

0

फ्लिपकार्टनंतर आता स्नॅपडील या ई-पोर्टलनेही ‘स्नॅपडील लाईट’ या नावाने मोबाईल वेबसाईट लॉंच केली आहे.

मध्यंतरी बहुतांश ई-पोर्टल्सनी स्मार्टफोन ऍपला प्राधान्य दिले होते. फ्लिपकार्टने तर आपली वेबसाईट बंद करण्याची घोषणा केली होती. मोबाईल ऍप हे व्यवसायासाठी उपयुक्त असले तरी अनेकांना याचा इंटरफेस समजत नाही. यातच ऍप डाऊनलोड करणेही अनेकांना जिकरीचे वाटते. यामुळे फ्लिपकार्टने आपला निर्णय बदलून काही दिवसांपुर्वीच मोबाईल ब्राऊजरवर वेगाने खुलणारी वेबसाईट सुरू केली. ‘फ्लिपकार्ट लाईट’ या नावाने ही वेबसाईट सादर करण्यात आली. यात मोबाईल ब्राऊजरवर ही साईट एखाद्या ऍपप्रमाणेच दिसते.

दरम्यान, फ्लिपकार्ट पाठोपाठ आता स्नॅपडील या ई-पोर्टलनेही खास मोबाईल ब्राऊजरसाठी ‘स्नॅपडील लाईट’ या नावाने वेबसाईट सादर केली आहे. यात संथ गतीच्या इंटरनेटवरही ही वेबसाईट वेगाने उघडू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here