स्नॅपडीलच्या ‘वेलकम-२०१७’ला प्रारंभ

0

स्नॅपडीलने आपल्या ग्राहकांसाठी घसघशीत सुट प्रदान करत दोन दिवसीय ‘वेलकम-२०१७’ हा विक्री महोत्सव सुरू केला आहे.

‘वेलकम-२०१७’ हा महोत्सव ८ आणि ९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात वस्त्रे-प्रावरणे, इलेक्ट्रॉनिक्सची विविध उपकरणे तसेच स्मार्टफोन आदी प्रॉडक्टवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. यात ग्राहक शाओमी रेडमी नोट ३-११९९९, सॅमसंग जे २ प्रो (१६ जीबी)-९४९०, आयफोन५एस (१६ जीबी)-१७४९९, आयफोन ७( ३२जीबी)-५२९९९ तर आयफोन ६एस-४३९९९ रूपये मुल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. प्रत्येक क्रेडिट कार्डधारकांना विनाव्याजी ईएमआयची सुविधादेखील देण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणार्‍यांना १५ टक्के अतिरिक्त सुटदेखील यात प्रदान करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here