स्नॅपडीलवरून मिळणार झोलो इरा वन एक्स प्रो !

0

झोलो कंपनीने ५,८८८ रूपये मुल्यात इरा वन एक्स प्रो हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला असून हे मॉडेल स्नॅपडील या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

झोलो कंपनीने गत वर्षी इरा वन एक्स हे मॉडेल लाँच केले होते. इरा वन एक्स प्रो ही याचीच पुढील आवृत्ती आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्लेआहे. यात १.५ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविता येईल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ६.० म्हणजेच मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असेल. यात ॉटो-फोकस आणि एलईडी फ्लॅश हे फिचर्स असतील तर फ्रंट कॅमेर्‍यात ड्युअल एलईडी फ्लॅश असून त्याची क्षमता ५ मेगापिक्सल्सची असेल. या मॉडेलमध्ये अँबियंट लाईट सेन्सर, प्रॉक्झीमिटी सेन्सर आणि अ‍ॅक्सलेरोमीटर हे विशेष फिचर्स आहेत. यात २५०० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांमध्ये असणारे हे मॉडेल स्नॅपडील या शॉपिंग पोर्टलवरून ग्राहकांना ५,८८८ रूपये मुल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here