स्नॅपडीलवर स्वतंत्र वाहन विभाग

0

स्नॅपडील या आघाडीच्या ई-पोर्टलने आता आपल्या ग्राहकांसाठी स्वतंत्र वाहन विभाग सादर केला आहे. या माध्यमातून ऑटोमोबाईल व विशेषत: दुचाकीच्या क्षेत्रात ही कंपनी दमदार पाऊल टाकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्नॅपडीलने या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासूनच ऑनलाईन दुचाकी विक्री सुरू केली होती. प्रारंभी फक्त ‘हिरो मोटोकॉर्प’ या कंपनीच्या बाईक आणि स्कूटर्स या माध्यमातून ऑनलाईन विकल्या जात होत्या. आता मात्र कंपनीने यासाठी आपल्या पोर्टलवर स्वतंत्र वाहन विभाग सुरू केला आहे. यात ‘हिरो मोटोकॉर्प’सह महिंद्रा अँड महिंद्रा, पिऍजिओ, सुझुकी मोटोरसायकल आणि डाटसन या कंपन्यांच्या उत्पादनांची श्रुंखला उपलब्ध करण्यात आली आहे.
स्नॅपडीलवरील वाहन विभागात जाऊन कुणीही युजर थोडी रक्कम भरत आपल्याला आवडलेल्या मॉडेलची नोंदणी करू शकतो. यानंतर त्याच्या जवळच्या डीलरच्या माध्यमातून त्याला संबंधीत बाईकची डिलीव्हरी प्रदान करण्यात येईल. कंपनीच्या वेबसाईटवर त्याला त्या बाईकबाबत सर्व तांत्रिक माहिती पाहता येईल. तर टेस्ट राईडसह अन्य माहिती त्याला डिलरकडे मिळू शकणार आहे. स्वतंत्र वाहन विभागाच्या माध्यमातून स्नॅपडीलने ऑटोमोबाईल व विशेषत: दुचाकीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. तसेच यातून ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रणालीचा संगमही करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here