स्मार्टफोनवर बॅग ट्रॅकर

0

स्मार्टफोनवरून आपली बॅग नेमकी कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी सेर्को या कंपनीने बॅग ट्रॅकर तयार केले आहे.

bag_tracker

विमानतळासह विविध प्रवासातील स्थळांवर नेहमी बॅगांची तपासणी होत असते. यानंतर ती बॅग शोधण्यात बराच वेळ जात असतो. तर प्रवासात अनेकदा आपली बॅग शोधतांना अडचणी येत असतात. यावर मात करण्यासाठी सेर्को या कंपनीने बॅग ट्रकर तयार केले आहे. यात स्मार्टफोन ऍप्लीकेशन आणि वाय-फाय ट्रॅकरचा समावेश आहे. हे बॅग ट्रॅकर आपल्या बॅगच्या तळाशी ठेवायचे असते. याचा उपयोग करून ७० मीटर अंतराच्या आत आपली बॅग नेमकी कुठे आहे? हे अगदी अचूकपणे शोधता येते. सध्या या माध्यमातून एका वेळी तीन बॅगा शोधता येतात. येत्या काळात बॅगांच्या संख्येसह ७० मीटरची मर्यादा वाढविण्यात येणार असल्याचे सेर्को कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here