हाईकवर मोफत ग्रुप कॉलिंग

0

हाईक या मॅसेंजरवर आता मोफत ग्रुप कॉलिंग हे फिचर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. ताज्या अपडेटमध्ये याची सुविधा मिळणार आहे.

Hike-Messenger

हाईक हे अत्यंत वेगाने लोकप्रिय होणारे मॅसेंजर म्हणून ख्यात आहे. व्हाटसऍप व व्हायबर, लाईन आदी विश्‍वविख्यात मॅसेंजरमध्येही नसणार्‍या अनेक उत्तमोत्तम सुविधा यात देण्यात आल्या आहेत. विशेषत: अलीकडच्या काळात तर हाईकने आपल्या युजर्सला नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटाच लावला आहे. काही दिवसांपुर्वीच यावर ब्रेकिंग न्यूजची व्यवस्था पुरविण्यात आली आहे. यानंतर तब्बल पाच हजार स्टीकर्सचा खजिनादेखील देण्यात आला आहे. आता ताज्या अपडेटमध्ये मोफत ग्रुप कॉलिंग ही सुविधा दिलेली आहे.

हाईकमध्ये आधी मोफत कॉलिंग हे फिचर असले तरी यासाठीची पध्दत ही काहीशी क्लिष्ट होती. आता एका टॅबवर क्लिक करून कुणीही आपल्या ग्रुपमधील 100 सदस्याशी मोफत कॉलिंग करू शकतो. हाईकचे आज ताजे अपडेट करण्यात आले आहे. यात हे फिचर दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here