हॉटेल बुकिंगकरिता क्लिअरट्रिपचे ‘इंस्टंट सर्च’

0

ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्याच्या आपल्या प्रतिबद्धतेला अधोरेखित करताना भारतातील प्रमुख ट्रॅव्हल मंच क्लिअरट्रिपने अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही मंचावरील आपल्या मोबाईल अॅपकरिता ‘क्लिअरट्रिप इंस्टंट सर्च’ सुविधा दाखल केली आहे. या नवीन सर्च सुविधेचे उद्दिष्ट क्लिअरट्रिप मोबाईल अॅपवर हॉटेल रूम शोधून तो बुक करण्यासाठी लागणारा अवधी कमी करण्याचा आहे. क्लिअरट्रिप इंस्टंट सर्च नाविन्यपूर्ण आणि वापरण्यासाठी सोपे आहे. हॉटेलची बुकिंग करण्याकरिता हॉटेल सर्च फॉर्मवर जाऊन शहर/परिसर तसेच तारीख निवडल्यास आपल्या आवश्यकते अनुसार हॉटेल्सची यादी शो हॉटेल्समध्ये दर्शविते.

क्लिअरट्रिपचे उत्पादन प्रमुख सुब्रमण्य शर्मा यांनी सांगितले की, ‘क्लिअरट्रिपमध्ये आम्ही नेहमीच वापरकर्त्यांना पावसाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी जलद सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहोत. सद्य परिस्थिती जेव्हा प्रवाशांना एखाद्या प्रवासाची योजना चालता-चालता बनवायची असते तेव्हा त्यांना राहण्यासाठी चांगले पर्याय दाखविणे तसेच त्यांचा बुकिंग अनुभव विशेष स्वरूपात मोबाइलवर सहज उपलब्ध करून देणे काळाची गरज बनली आहे कारण याकरिता मोबाइलच्या होणा-या वापरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवासाची योजना बनविण्याकरिता प्रवाशांद्वारे दिला जाणारा वेळ हा मौल्यवान असून त्यांना कमी वेळेत योग्य सेवा देण्यासाठी आम्ही ही नवीन सुविधा सुरु केली आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here