२३ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने सज्ज सोनी एक्सपेरिया एक्सए१ प्लस

0

सोनी कंपनीने आपला सोनी एक्सपेरिया एक्सए१ प्लस हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून याची खासियत म्हणजे यात तब्बल २३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सोनी एक्सपेरिया एक्सए१ प्लस हे मॉडेल पहिल्यांदा ‘आयएफए-२०१७’मध्ये प्रदर्शीत करण्यात आले होते. आता हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत २४,९९० रूपयात लाँच करण्यात आला आहे. हे मॉडेल ग्राहकांना कंपनीच्या देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येईल. यातील मुख्य कॅमेरा २३ मेगापिक्सल्सचा असून यामध्ये एफ/२.० अपार्चर, फेज डिटेक्शन, ऑटो-फोकस आदी विशेष फिचर्स असतील. तर यातील फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.

सोनी एक्सपेरिया एक्सए१ प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी२० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची चार जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. क्विक चार्ज २.०+ तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ३४३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. यामध्ये सोनी कंपनीने विकसित केलेली क्लिअर ऑडिओ+ ही विशेष प्रणाली देण्यात आली असून याच्या मदतीने सुश्राव्य ध्वनीची अनुभुती घेता येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here