प्रायव्हसी चेकअपसाठी फेसबुकचे चार नवीन फिचर्स

0

फेसबुकने आपल्या युजर्सच्या प्रायव्हसी चेकअपसाठी चार नवीन फिचर्स दिले असून या माध्यमातून वापरकर्त्यांची गोपनीयता व सुरक्षितता कायम राहणार असल्याबद्दल आश्‍वस्त केले आहे.

सध्या सायबरविश्‍वातील सुरक्षिततेचा मुद्दा चिंतेचा विषय बनलेला आहे. युजर्सची कोणतीही माहिती ही गोपनीय राहत नसून याचा गैरवापर होत असल्याचे अनेक प्रकार घडत असल्याने बरेच जण चिंतेत पडलेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटने आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेसाठी चार नवीन फिचर्स दिलेले आहेत. याबाबतची माहिती एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

या पोस्टनुसार, हे चारही फिचर्स प्रायव्हसी चेकअपसाठी दिलेले आहेत. या प्रकारच्या चेकअपचे फिचर हे २०१४ साली प्रदान करण्यात आले असून आता याचे नवीन अपडेट प्रदान करण्यात आले असून यात या चारही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

यातील पहिले फिचर हे ‘हू कॅन सी व्हाट यू शेअर’ या फिचरच्या मदतीने कुणीही आपले प्रोफाईल, मोबाईल क्रमांक वा ई-मेल आदी माहिती कुणी पहावी याची सेटींग करू शकेल. यातील दुसरे फिचर ‘हाऊ टू किप युवर अकाऊंट सिक्युअर’ हे असून याच्या मदतीने युजर अभेद्य असा पासवर्ड टाकण्यासह लॉगीन अलर्टची माहिती मिळवू शकतो. तिसरे फिचर ‘हाऊ पीपल कॅन फाऊंड यू ऑन फेसबुक’ हे असून याच्या मदतीने युजर लोकांनी आपल्याला फेसबुकवर कशा पध्दतीत सर्च करावे ? तसेच कुणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी हे सेट करू शकणार आहे. तर, ‘युवर डाटा सेटींग ऑन फेसबुक’ या चौथ्या फिचरच्या मदतीने युजर फेसबुकच्या अकाऊंटसह लॉगीन केलेल्या अ‍ॅप्सवर नेमका किती डाटा उपयोगात आणला जातो यावर नजर ठेवून हे अ‍ॅप डिलीटदेखील करू शकणार आहे.

फेसबुकचे हे चारही फिचर्स जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात वापरण्यासाठी मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here