फेसबुकचा नवीन लूक: युजर्सच्या माध्यमातून चाचणी

0

फेसबुकची नवीन डिझाईन सादर करण्यात येत असून हा नवीन लूक वापरण्याचे नोटिफिकेशन युजर्सला पाठविण्यात येत आहे.

गत वर्षाच्या प्रारंभीच फेसबुकचे रिडिझाईन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. या अनुषंगाने गत वर्षाच्या शेवटी फेसबुकचे बोधचिन्ह अर्थात लोगो बदलण्यात आला होता. यानंतर आता नवीन स्वरूपातील फेसबुक हे युजर्सला सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. काही युजर्सला फेसबुकतर्फे नवीन लूक वापरण्याचे आवाहन नोटिफिकेशनच्या माध्यमातून केले जात आहे. अर्थात, या युजर्सच्या माध्यमातून नवीन डिझाईन करण्यात आलेल्या फेसबुकची चाचणी घेतली जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या युजर्सनी दिलेल्या माहितीवरून https://vosveteit.sk/ या टेक पोर्टलने फेसबुकच्या नवीन लूकबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यानुसार आता फेसबुकच्या मुख्य पेजवर बर्‍याच प्रमाणात बदल दिसून येणार आहेत. यातील लक्षणीय बदल म्हणजे फेसबुकचा नवीन लोगो हा चौरसाकृती नव्हे तर गोलाकार व आकाराने ठसठशीत असणार आहे. तर अन्य विभागांचे आयकॉन्स व याची माहितीदेखील आधीपेक्षा मोठ्या आकारात असणार आहे. तर विविध नोटिफिकेशन्स हे उजवीकडे कोपर्‍यात असणार आहेत.

फेसबुकच्या नवीन डिझाईनमध्ये युजरच्या प्रोफाईलमध्येही थोडा बदल करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत आता कव्हर इमेजच्या मध्यभागी आता युजरला प्रोफाईल फोटो असेल. तर स्टोरीज विभागात आपल्या मित्रांच्या स्टोरीज लाईक करण्यासाठीचा विभाग आता थोडा मोठा केला जाणार आहे. या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या नवीन डिझाईनसोबत फेसबुकच्या युजर्सला डार्क मोडदेखील प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती या वृत्तामध्ये देण्यात आलेली आहे. सध्या युजर्सच्या माध्यमातून या नवीन डिझाईनची चाचणी घेण्यात येत असून नंतर सर्वांसाठी हे अपडेट देण्यात येणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here