व्हाटसअ‍ॅपवर डार्क मोड कसा वापराल ?

0
डार्क मोड अ‍ॅक्टीव्हेट केल्यानंतर या प्रकारे दिसतो.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी बहुप्रतिक्षीत डार्क मोड प्रदान केला असून याचा नेमका कसा वापर करावा याबाबतची ही स्टेप-बाय-स्टेप माहिती.

व्हाटसअ‍ॅपवर डार्क मोड येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. मध्यंतरी हे फिचर व्हाटसअ‍ॅपच्या बीटा युजर्ससाठी प्रदान करण्यात आले होते. आता ही सुविधा अँड्रॉइड प्रणालीच्या सर्व युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे. अर्थात, याला वापरण्याआधी आपल्याला व्हाटसअ‍ॅपची ताजी आवृत्ती गुगल प्ले स्टोअरमधून अपडेट करावी लागणार आहे. हे अपडेट केल्यानंतर खालील स्टेप प्रमाणे जाऊन आपण डार्क मोड अ‍ॅक्टीव्हेट करू शकतात.

१) व्हाटसअ‍ॅपच्या सेटींगमध्ये जा.

२) येथे चॅट या विभागात जाऊन थीम या भागात जा. येथे आपल्याला लाईट आणि डार्क असे दोन पर्याय दिसतील. यातील डार्क हा पर्याय निवडा. यानंतर आपण डार्क मोड वापरू शकाल.

डार्क मोड अ‍ॅक्टीव्हेट झाल्यानंतर व्हाटसअ‍ॅपचा पार्श्‍वभाग हा काळ्या रंगाचा होईल. अर्थात आपण हा नवीन मोड वापरू शकाल.

डार्क मोडचे लाभ

सध्या जगभरातील अब्जावधी लोक हे स्मार्टफोनचा विपुल वापर करत आहेत. यामुळे डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येत असतो. या पार्श्‍वभूमिवर, डार्क मोड हा डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. विशेष करून रात्रीच्या वेळेस एखाद्या अ‍ॅपचा मागील भाग हा गडद असल्यास डोळ्यांवर तुलनेत कमी ताण येत असल्याचे शास्त्रीय संशोधनातून सिध्द झालेले आहे. नेमक्या याच कारणांमुळे विविध अ‍ॅप्सनी आपल्या युजर्सला डार्क मोड प्रदान केला आहे. यात प्रामुख्याने फेसबुक मॅसेंजर, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचे डार्क मोड हे लोकप्रिय झालेले आहेत. तर फेसबुकवर अजून याची चाचपणी सुरू आहे. या पार्श्‍वभूमिवर, गत काही महिन्यांपासून चाचणी केल्यानंतर आता व्हाटसअ‍ॅपवरदेखील डार्क मोड देण्यात आला असून कुणीही युजर याचा वापर करू शकतो.

व्हाटसअ‍ॅप डार्क मोड, whatsapp dark mode

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here